देश

कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स तसंच इतर आरोग्य कर्मचारी पहिल्या दिवसापासून दिवसरात्र मेहनत करत असताना दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले होत असल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वारंवार होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आता यासंबंधी भाष्य केलं असून हे स्विकारलं जाऊ शकत नाही, असं म्हटलंय.

मला हे अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्यासोबत हिंसाचार, असभ्य वर्तन आणि गैरवर्तन स्विकारलं जाऊ शकत नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या 10 देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे 1 लाख 90 हजार 609 रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागं टाकलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचं शिवप्रेमींना आवाहन, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…

…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या