आरोग्य कोरोना नागपूर महाराष्ट्र

लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर

नागपूर | लॉकडाउन वाढवला जाणार की नाही याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता अकोल्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

पालकमंत्री बच्चू कडू संचारबंदी जाहीर केली असून 1 ते 6 जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. अकोला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

सार्वजनिक स्तरावर क्वारंटाइन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचं मूल्यांकन केलं जाईल. मूल्यांकनात काही चुकीचं आढळलं तर कारवाई केली जाईल. मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

1 ते 6 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. सगळं काही बंद असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस

पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या