मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसंच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठवण्यात येऊ नये, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोव्हिड 19 लक्षणे नसलेल्या पण कोव्हिड 19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रांमध्ये पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबईतील कोव्हिड 19 रुग्णांची संख्या पाहता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत. कोणीही त्यापासून वंचित राहू नये तसेच करोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.
मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावं. जेणेकरून रुग्णवाहिकांची ने-आण करताना सुसूत्रता येईल, असंही आदेशात सागंण्यात आलं आहे.
#कोविड१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश pic.twitter.com/lmCwZz1s2E
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 30, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“ऋषी कपूर म्हणजे प्रतिभा संपन्नतेचे शक्तीस्थळ”
लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय- विराट कोहली
माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प
…तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे अधिक लोकांचा मृत्यू होईल- नारायण मुर्ती
Comments are closed.