महाराष्ट्र मुंबई

“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

मुंबई | आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या नाहीत. बेडूक उड्या, कोलांट उड्या मारल्या नाहीत. दिवे घालवून दिवे जाळले नाहीत. वारंवार राज्यपाल यांच्याकडे गेलो नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे

भाजप आज राज्यभरात आंदोलन करत असून त्याच पार्श्वभूमीवर मनिषा कायंदे यांनी ही टीका केली आहे. घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कोरोनातून लोकांना वाचवण्यासाठी कठोर झाले. त्यांनी हजारो बेड्सची व्यवस्था केली. कोविड सेंटर्स उघडली, 10 रुपयांची शिवभोजन थाळी 5 रूपयांत तर अनेक ठिकाणी मोफत दिली. रेल्वेने मजुरांना घरपोच पाठवले, पाच लाख मजुरांची तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली, खरंच देवेंद्र भौ आमचं चुकलंच, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही राजकरण करू शकलो नाही देवेंद्र भौ कारण आमचे नेते उद्धव ठाकरे आहेत जे कामातून बोलतात. टाळ्या आणि थाळ्या वाजवून नाचायला आणि दिवे घालवून दिवे जाळायला सांगत नाहीत, असा टोला मनीषा कायंदे यानी लगावला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे

राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या