महाराष्ट्र मुंबई

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय विसरु नका, अशी आठवण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन करुन दिली आहे.

पियुषजी, 14 मे रोजी सुटलेल्या नागपूर-उधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती? आधी ट्रेन, नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरु नका, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

पहाटेचे 2 वाजले. 125 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सोडण्याची आपली तयारी असताना फक्त 46 ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत रेल्वेमंत्री गोयल यांनी ठाकरे सरकारकडे बोट दाखवलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्र हे विरोधकांचं राज्य आहे हे जर डोक्यातून काढलं तर यादीची गरज पडणार नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारेच केंद्रातले नेते याद्या मागत आहेत. फक्त महाराष्ट्राकडेच यादी मागितली जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री असं वागतात याचं आश्चर्य आणि खेद आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

‘योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा…’; राज ठाकरे यांचा थेट इशारा

दीपिका रणवीरचं लॉकडाऊन… पाहा दीपिकाचा रोमँटिक अंदाजातला व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या