बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल”

मुंबई | आधी मजूर त्यांच्या गावी नीट पोहोचले का याकडे लक्ष द्या असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसं असेल तर आम्हाला देखील येथे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरु केलं पाहिजे. सर्वांना पारखून घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का? त्यांना अन्न पाणी नीट मिळतंय का याकडे योगींनी लक्ष द्यावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दीड महिना महाराष्ट्रात मजुरांची कशी व्यवस्था केली होती याचे व्हिडीओ पाठवू शकतो. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल, भाजप व्यतिरिक्त सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

महत्वाच्या बातम्या-

आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

…म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More