नागपूर महाराष्ट्र

चीनबद्दल जगात द्वेष वाढणं ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी- नितीन गडकरी

नागपूर | कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात द्वेष वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचा प्रसार केल्याने चीनविरोधात जगभरात द्वेष वाढत असताना भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आर्थिक संधी असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

नितीन गडकरी यांना विद्यार्थ्यांनी जर चीनने जाणुनबुजून या व्हायरसचा फैलाव होत असल्याची माहिती लपवली असल्याचं समोर आलं तर भारत काही कारवाई करणार का ? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधित हा विषय असल्याने आपण त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द; भारत सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाशी लढणाऱ्या आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या