लखनऊ | देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तबलिगी जमातने जाणूनबुजून कोरोना पसरवला आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
तबलिगींनी कोरोना लपवला. हा अक्षम्य अपराध आहे. त्यांनी कोरोना लपवला नसता, तर आज कोरोनाचे कमीत कमी रुग्ण असते, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
तबलिगी जमातने गुन्हा केला असून त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उत्तर प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित तीन हजार लोक सापडले असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, आजार होणे हा गुन्हा नाही. पण कोरोनासारखा आजार लपवून ठेवणे हा नक्कीच गुन्हा आहे. ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?
महत्वाच्या बातम्या-
‘मातोश्री’ प्रवेशद्वारावरच्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण
कामगारांना घेऊन नाशिकहून लखनऊला विशेष ट्रेन रवाना; भुजबळांनी दाखवला हिरवा कंदील
…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन
Comments are closed.