देश

“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”

कोलकाता | जर राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात अयशस्वी ठरतंय असं वाटत असेल तर तुम्ही स्वत: परिस्थिती हाताळत का नाही? अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावलं आहे.

मी अमित शाह यांना सांगितलं आहे की, तुम्ही वारंवार केंद्रीय टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवत आहात. तुम्ही जे हवं ते करु शकता. पण जर पश्चिम बंगाल सरकार योग्य काम करु शकतं असं तुम्हाला वाटत नसेल तर मग तुम्हीच हे करोना संकट का हाताळत नाही? मला काहीच समस्या नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

मला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्या असं सांगायचं आहे. आपल्याकडे आधीच कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. काहीजण राजकारणासाठी फैलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सगळीकडे फैलाव होत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावं ? पंतप्रधानांनी अशा वेळी मध्यस्थी करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

महत्वाच्या बातम्या-

आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी

राज्यात आज कोरोनाचे 2598 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या