बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच कोरोनाची चाचणी केली जाईल- राजेश टोपे

पुणे | करोनाची तीव्र लक्षणे आढळून आल्यास किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री मध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातून प्रवास केला असेल तरच कोरोनाची चाचणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सध्या करोना व्हायरसमुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसबद्दल अनेकांकडे अल्प माहिती असल्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास करोनाची चाचणी करण्यासाठी अनेकजण रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.

तुम्हाला सर्दी, खोकला झाला म्हणून कोरोनाची चाचणी होणार नाही. या चाचणीचे काही प्रोटोकॉल आहेत. खर्च आहे. त्या प्रोटोकॉलनुसारच चाचणी होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा होणारा फैलाव लक्षात घेता, महाराष्ट्रात लॅबची संख्या प्रचंड कमी आहे. कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या वाढवणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना व्हायरसच्या चाचण्या करणाऱ्या आठ नवीन लॅब होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

कोरोनाचा परिणाम, परीक्षा न देता विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात!

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल

पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव; दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More