बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विमान प्रवाशांसाठी ‘अशा’ आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स!

मुंबई | देशातील सर्वच विमानतळांवर आज विमाने सुरू करण्यात आली. सर्वच विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचं मानत नवी सुरूवात केली जात आहे.

दुसऱ्या राज्यांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम निर्धारित केले आहेत. येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होईल आणि डाव्या हातावर शिक्का मारला जाईल. तसेच त्यांच्यासाठी 14 दिनसांचे होम आयसोलेशन अनिवार्य असेल.

प्रवासी जर एखाद्या कार्यालयात काम करत असेल, तर स्थानिक प्रशासन होम आयसोलेशनमध्ये काही सूट देऊ शकते. तसेच आवश्यकतांचा विचार करूनही प्रशासन सूट देण्यावर विचार करू शकतं. जर एखादा प्रवासी महाराष्ट्रात आला आणि तो एक आठवड्यातच परत जाणार असेल तर, त्याला होम आयसोलेशनमध्ये राहणे अनिवार्य नाही. मात्र त्यांना यासंदर्भात राज्य सरकारला माहिती द्यावी लागेल. तसेच, अशा व्यक्तीला कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची परवानगी नसेल.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हणण्यात आले आहे, की एखादा प्रवासी रेसिडेंशल भागात राहण्यासाठी जात नसेल, तर त्याला आपल्या राहण्याच्या ठिकाणासंदर्भात माहिती द्यावी लागेल.जेनेकरून संबंधित ठिकाणाचे सॅनिटायझेशन करता येईल.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

अजितदादा कुठं आहेत?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More