महाराष्ट्र मुंबई

“मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा”

Loading...

मुंबई | आज जगात कोरोना विषाणुने थैमान घातलं आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमूखी पडत आहेत. शासन – प्रशासन यंत्रणा सर्व स्तरावर सर्व शक्तीनिशी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मस्जिद मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा उपदेश करीत आहेत.

देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढतांना सर्वांसोबत मुस्लीम बांधवांनी सजग राहून सहकार्य करावं आणि सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा, असं आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत असल्याचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.

मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबल आहे. आपणही थांबले पाहीजे, मंदिर ,चर्च, बंद आहे , मस्जिद बंद ठेवली पाहीजे, असंही शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सब कुछ अल्लाह के मर्जीसे होगा, वह बचाने वाला है वगैरे वक्तव्य करुन दुआ करायला सांगत आहेत, अंधश्रद्धाही पसरवत आहेत. अशा वर्तनामुळे हाहाकार माजणार असल्याचं तांबोळी यांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत

इटलीत कोरोनामुळे हाहाकार; मृतांची संख्या 10 हजारांवर

महत्वाच्या बातम्या-

लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण?; पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या