Top News

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही- डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई | योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिल औषधाने कोरोना बरा होत नाही. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा पतंजलीने संभ्रम निर्माण केल्यास किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येई,ल असा इशारा अन्न आणि औषधं प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पतंजलीच्या कोरोनिल या औषधामुळे जनतेमध्ये कोरोना बरा होतो असा संभ्रम निर्माण करुन त्यांची दिशाभूल होतोय. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले कोरोनिल हे औषध अश्वगंधा, तुळस आणि गुळवेल वापरुन तयार केलेली गोळी आहे. तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो, असं अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे.

कोरोनिल हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) आणि प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातींमुळे जनतेची दिशाभूल तसंच संभ्रम निर्माण होतोय. कोरोनिलचा वापर फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असं डॉ. शिंगणे म्हणाले आहेत.

योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलेलं. या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

महत्वाच्या बातम्या-

…तर जुलैअखेर रूग्ण संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल, पुणे महापौरांच्या सरकारकडे या महत्त्वाच्या मागण्या

पोलिस अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

शाहिद आफ्रिदीची भारतीय लष्करावर टीका, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या