बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही त्यामुळे…; मोदींचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली | कोरोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. कोरोना लागण होतोना कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही त्यामुळे कोरोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली असून त्यामधून कोरोना संकट आणि त्याच्याशी सामना करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

भारतातून येणाऱ्या नव्या संकल्पना संपूर्ण जगासाठी समपर्क असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये फक्त भारतच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी सकारात्मक बदल करण्याची क्षमता असली पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारतासारखा तरुण देश जो आपल्या उत्साही विचारसणीसाठी ओळखला जातो तो या नव्या संस्कृतीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

दिलासादायक! देशातील ‘हे’ राज्य झालं कोरोनामुक्त; मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा

मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला

महत्वाच्या बातम्या-

पीएम केअर फंडाच्या नावाखाली भाजप नेत्यांनी दिलेली वेबसाईट फेक?

पुण्यातील सरपंचाच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; फोन करून केली आपुलकीने चौकशी

…तरच करोनाविरुद्धचे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More