बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…

नवी दिल्ली | मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही, असा उपदेश करणाऱ्या मौलाना साद यांचा आणखीन एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

दिल्ली पोलिसांनी मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर साद फरार आहेत. आता मात्र त्यांनी आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीनं क्वारंटाईन झाल्याचं सांगितलंय. दिल्लीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण आयसोलेशनमध्ये असल्याचं साद यांनी म्हटलंय.

मौलाना साद यांनी आपल्या ऑडिओमध्ये जोर देऊन डॉक्टरांच्या सूचना पाळण्याचा संदेश दिला आहे. सोबतच हे शरीयतच्या विरुद्ध नसल्याचंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय.

मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. तुम्हाला मशिदीत येण्यानं व्यक्ती मरेल असं दिसलं तरी मी तर म्हणतो की, मरण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असून शकत नाही, असं मौलाना साद याआधी म्हणाले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या संकटात अजय देवगननं सिनेकामगारांना दिली मोठी रक्कम

क्वारंटाईन टाईम म्हणत ‘या’ अभिनेता-अभिनेत्रीनं बेडरुमधले फोटो सोशल मीडियावर टाकले

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळं शिख धर्मगुरुच्या मृत्यूनं खळबळ; क्वारंटाईन असताना गावोगावी केली प्रवचनं

कोरोनाला रोखण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

कोरोनाबाबत चीनचा अत्यंत धक्कादायक खुलासा

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More