बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मशिदीत जाणं बंद करु नका, मरण्यासाठी मशिदीसारखी दुसरी चांगली जागा नाही”

नवी दिल्ली | देशात कोरोनामुळे भीतीचं वातावरण असताना तबलिगी जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरला आहे. याच जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही, असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांनी केलं आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये मौलाना साद यांचा आवाज ऐकू येत आहे. तसेच या दरम्यान काही लोक खोकतानाही ऐकू येत असून त्याकडे लक्ष दिलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो?, असं मौलाना साद म्हणाले.

दरम्यान, जर कुणी म्हणत असेल की मशिदी बंद करायला हव्यात, त्यांना टाळं लावायला हवं, कारण हा आजार वाढत जाईल तर हा विचार तुमच्या मनातून काढून टाका, असं देखील मौलाना साद यांनी म्हटल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

तु मेरे अगल बगल है! सलग पाचव्यांदाही कनिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीडमधील गावात घराच्या बाहेर पडण्यास मज्जाव; गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल

महत्वाच्या बातम्या-

निजामुद्दीन ‘मरकज’साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं- अनिल देशमुख

“देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलावून परिस्थिती नियंत्रणात ठेवा”

रैनाने दिलेल्या मदतनिधीवर पंतप्रधान मोदी म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More