जिनेव्हा | वर्षभरापासून जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक देश लस तयार करत आहेत. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांनी इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.
कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मात्र कोरोना हा शेवटचा महासाथीचा आजार नसल्याचं टेड्रोस घेब्रायस यांनी म्हटलं आहे.
कोरोना महासाथीच्या आजारापासून शिकण्याची ही वेळ आहे. दीर्घकाळापासून जगाने भय आणि उपेक्षांच्या चक्रात काम केलं आहे. आजार संपल्यानंतर आपण त्या संकटाला विसरतो आणि पुढील महासाथीचा आजार रोखण्यासाठी काहीच करत नाही, असंही घेब्रायस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हवामान बदल रोखणे आणि पशू कल्याण केल्याशिवाय मानवी आरोग्य सेवा सुधारण्याचे प्रयत्न व्यर्थ असल्याचं घेब्रायस म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस
‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!
“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”
अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; पत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी