Top News

‘आमच्यानंतर फक्त भारतच…’; डोनाल्ड्र ट्रम्प यांच्याकडून भारताचं कौतुक

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून दुसरा कोणताही देश जवळपासही फिरकत नाही असंं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

आम्ही जवळपास साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून इतर कोणताही देश आमच्या जवळपासही नाही. एक कोटी 10 लाख चाचण्यांसोबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्याही 130 कोटी आहे. आतापर्यंत चाचण्यांची संख्या पाहता आम्ही पहिल्या क्रमांकावर असून दर्जात्मक चाचणीतही आम्हीच अव्वल आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय.

वर्ष संपण्यापूर्वी लस उपलब्ध होईल याची मला खात्री आहे आणि ती उपलब्ध झाल्यानतंर लगेचच तिचा वापरही सुरु होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत गेल्या सात दिवसांमध्ये करोना रुग्णसंख्या 14 टक्क्यांनी कमी झाली आहे. तसंच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सात टक्के तर मृत्यूदर नऊ टक्क्यांनी कमी झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; वडिलांच्या संपत्तीत मुलीला मिळणार…

माझं आणि फडणवीस यांचं या गोष्टीवर एकमत आहे- राज ठाकरे

‘घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन घरच्या घरी करा’; महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुणेकरांना आवाहन

“राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?,मी सांगतोय जिम सुरु करा”

ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या