Top News

कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पाच महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण!

वुहान | चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पाच महिन्यांनी पुन्हा एकदा महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता वाढली आहे.

हुबेई प्रांतातील रुग्णालयात महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. महिला करोनामुक्त झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. दुर्मिळ अशा या प्रकरणातून विषाणू शरिरातून नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेत असल्याचं समोर येत आहे, असं विषाणूशास्त्रज्ञांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितलंय.

या केसवरुन कोरोना व्हायरस शरीरातून पूर्ण नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेईल हे निदर्शनास येत आहे. काही रुग्णांच्या शरीरात विषाणूंचं प्रमाण कमी असतं, यामुळेच महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असण्याची शक्यता आहे, असं वुहान विद्यापीठातील रोगकारक जीवशास्त्र विभागाचे यांग झांकीऊ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होणं चीन आणि इतर देशांसाठी नवीन नाही. पण पुन्हा कोरोनाची लागण होण्यासाठी लागलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधी असल्याचं सागंण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं”

आता ईडी सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीगार्डची करणार चौकशी

‘हे’ नवीन मेड इन इंडिया अ‌ॅप देणार फेसबुकला टक्कर

‘देवा… माझ्या वडिलांना बरं कर’; शर्मिष्ठा मुखर्जींची ईश्वराकडे प्रार्थना

गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘हे’ खास अ‌ॅप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या