बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यास राज्यसरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

मुंबई | येत्या काही काळात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वाढलेला दिसत आहे. त्यामुळेच आता कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आरोग्य सुविधांचा आढावा घेत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पुर्ण केली जावी. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेता येईल का याचाही विचार करावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना किती आरोग्य सुविधा, ऑक्सिजन आणि औषध साठा लागेल याची निश्चिती करा. दररोज 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट पुर्ण करताना राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वेगाने वाढवावी, असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना पुन्हा वाढल्यास मागील चुका पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यसरकार तयारी करत असल्याचं चित्र समोर येत आहे. राज्यात कोरोना स्थितीसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. त्यावर सर्व जिल्ह्यांची पुर्ण माहिती असणार आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

चिंता वाढली! कोरोनाच्या घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे या जिल्ह्यांत सापडले रूग्ण

बापमाणूस! लेकीच्या ‘ऑनलाईन क्लास’साठी मुसळधार पावसात छत्री घेऊन राहिला उभा

मोठी बातमी! ‘राज्यात 18 वर्षावरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस’; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More