बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांकडून अटक, कारण अत्यंत धक्कादायक

पिंपरी | राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अपुरा पडताना दिसत आहे. त्यातच आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पोलीस यावर धडक कारवाई करत असले तरी काही प्रमाणात हा काळाबाजार अद्यापही सुरूच आहे. आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या नगरसेविकेच्या मुलाचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या 20 वर्षीय मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मळेकर असं या मुलाचं नाव आहे. त्याच्याकडे पोलिसांना 2 रेमडेसिवीर इंजेक्शन सापडली. त्यानंतर त्याला अटक केली गेली आहे. आता पोलिसांनी ही इंजेक्शन ताब्यात घेतली आहेत.

पुणे पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 6 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शुभम आरवडे आणि वैभव मळेकर यांना अटक केली आहे.

दरम्यान, ही सर्व इंजेक्शन अवैधरित्या मिळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीत विकली जातात. ही औषधं मिळाली कशी याबद्दल  पोलिसांकडून याची सखोल चौकशी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

विश्वासाचं दुसरं नाव टाटा… देशवासियांना दिलेला शब्द चौथ्याच दिवशी पूर्ण केला!

कोलकाता आता आहे तय्यार! कोलकाताचा पंजाबवर 5 विकेट्सने विजय

कोरोनाबाधित आईच्या बाळावर मैत्रीच्या प्रेमाची सावली, नवजात बालकाला 11 दिवस दिली आईची माया

जात पात विसरत मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More