बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात पत्र व्यवहार; इम्रान यांचं पुन्हा ‘काश्मिर’ गुऱ्हाळ

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध वेळोवेळी सुधारतात, तर वेळोवेळी बिघडताना देखील असतात. मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांचे संबंध चांगल्या प्रकारे जुळून आल्याचं पहायला मिळत आहेत. 23 मार्च रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक पत्र लिहलं होतं. त्यांनी या पत्राद्वारे शेजारील राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता मोदींच्या या पत्राला इम्रान खान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पाकिस्तानला आपल्या सर्व शेजारील राष्ट्रांशी शांततापुर्ण संबंध राखण्याची इच्छा आहे. यामध्ये भारताचा समावेश आहे. आमचा विश्वास आहे की, दक्षिण आशियाई खंडातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व विषयांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः जम्मु काश्मिर वाद सोडवणे आवश्यक आहे. दोन्ही देशांना निकालाभिमुख आणि विधायक संवाद हवा असेल तर संवादाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे, असं इम्रान खान यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

मी या प्रसंगी कोरोना साथीच्या विरूद्ध युद्धासाठी सर्व भारतीयांना शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करा. पाकिस्तानशी संबंध सामान्य करण्यासाठी भारताला पहिलं पाऊल उचलावं लागेल. आम्ही यावर प्रयत्न करत आहोत. पण वाटाघाटीसाठी भारताला पुढाकर घ्यावा लागेल, असं टोचक आणि सुचक वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.

दरम्यान, विश्वास, दहशदवाद आणि वैर यांपासून ठेवलेलं अंतर दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचं आहे, असं मोदी यांनी इम्रान खान यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!

“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”

मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक

मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More