बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

नवी दिल्ली | गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीमुळे जगभरात अनेकांचे मृत्यु झाले आहेत. अनेकांच्या आरोग्याला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाची लस विकसित झाल्यानंतर लसीकरणावर अनेक देशांनी जोर देण्यास सुरवात केली आहे. एकेकाळी कोरोनाचा सर्वांत जास्त मुत्यू असलेल्या ब्राझीलने कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणली आहे. तर आता ब्राझील लसीकरणावर भर देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच भारतीय कंपनी भारत बायोटेकने ब्राझील सरकारसोबत करार केला होता.

कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबत कोव्हॅक्सिन लसीच्या खरेदीसंदर्भात एक करार केला. ब्राझील सरकार 20 मिलियन लसीच्या डोस खरेदी करणार असल्याचं ठरवण्यात आलं होतं. त्या करारनुसार 20 मिलियन लसीच्या डोसची किंमत 32 कोटी डॉलर्सची इतकी असल्यातं सांगण्यात येत होतं. परंतू आता हा करार स्थगित करण्यात आला आहे.

ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबत केलेल्या कररात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. ब्राझीलचे  राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्यावर झालेल्या आरोपामुळे ते वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ब्राझीलने भारत बायोटेकसोबत केलेल्या लस खरेदी करारात भ्रष्टचार झाल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला होता. ब्राझील सरकारने यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर भारत बायोटेक आणि ब्राझील सरकारमध्ये करार पुर्ण होईल अशी आशा होती.

दरम्यान, हे प्रकरण आता ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात गेलं असून, ब्राझील सरकारने या खरेदी कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भारत बायोटेकला या प्रकरणात मोठा तोटा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारतात 20 टक्के लोकांचंच लसीकरण झालं असताना लसी दुसऱ्या देशात पाठवण्याची काय गरज आहे, अशी टीका करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More