‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. शिवसेना नेते संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणाचा शिवसेनाला त्रास देण्यात येत आहे, असं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत.
15 फेब्रुवारीला ईडीच्या वसुली एजंट बाबत सांगितले होते. ईडीचे मोठे अधिकारी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले. ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपचे एटीएम मशीन झाले आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या उद्देशाने धाडसत्र सुरू आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीपर्यंत या धाडी सुरूच राहणार आहेत. ईडीला भाजपमधील लोकांची संपत्ती दिसत नाही. शिवसेनेलाही धाड टाकण्याचा अधिकार आहे, असा इशारा यावेळी बोलातान संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, ईडीचे अधिकारी बिल्डर्स आणि कार्पेोरेट्स यांना धमकावत आहेत.आम्ही ईडीला 50 नाव दिली आहेत. या लोकांचा तपास का होत नाही ?, असा सवालही संजय राऊतांनी केला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भाजप नेत्याकडे भ्रष्टाचारी पैसा आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार. पुढील काळात मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”
दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
Comments are closed.