बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो अन्…”

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या प्रमुख आरोग्य सल्लागार कार्यालयाकडून एक महत्त्वाची नवी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू बाधित व्यक्ती खोकल्यानं, शिंकल्यानं किंवा बोलल्यानं ड्रॉपलेटच्या मदतीने हवेत पसरतो. तेथूनच या संसर्गाला सुरुवात होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड 19 साठी राष्ट्रीय क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल तयार केलेत. यातच आता बदल झालेत. यात कोरोना विषाणूचं वहन करणारे ड्रॉपलेट्स जमिनीवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर असू शकता असं म्हटलंय.

आधीच्या संशोधनात जवळच्या व्यक्तीकडूनच संसर्ग होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, नव्यानं पुढे आलेल्या माहितीनुसार बाधित व्यक्तीच्या खोकला, शिंकणे किंवा बोलण्यातून विषाणू ड्रॉपलेटमधून फरशीवर किंवा इतर ठिकाणी काही काळासाठी राहू शकतो.

बाधित व्यक्तीच्या शरीरातून निघाणारे ड्रॉपलेट्स म्हणजेच एरोसोलच्या माध्यमातून कोरोनाचे विषाणू हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतात. हेच लक्षात घेऊन तज्ज्ञांनी शारीरिक अंतर, स्वच्छतेसह खेळती हवाही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. खेळती हवा हवेतील कोरोना विषाणूंचा धोका कमी करते असंही सांगण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! कर्मचारी ऑक्सिजन सपोर्टवर असतानाही जबरदस्तीनं बोलवलं कामावर अन्…., पाहा व्हिडीओ

देसी जुगाड! वाफ घेण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3.15 लाखांवर, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

धक्कादायक! लाॅकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मुलाच्या हाता-पायावर ठोकले खिळे?

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More