बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही; प्रियकराने रस्त्यात अडवून जे केलं त्याने सगळे हादरले

पाटणा | नालंदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुण-तरणीचं अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत झालं. यानंतर प्रियकराने जे केलं त्यानं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे.

संबंधित आरोपीचं नाव संजय असं आहे. संजय याचे अनेक वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीच्या घरातल्यांनी तिचं लग्न संजयसोबत न करता विकास नावाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं. संबंधित तरुणीचं लग्न 26 मे रोजी झालं होतं. प्रेयसीच्या लग्नाबाबत संजयला कळताच त्याला ती गोष्ट सहन नाही झाली.

चार दिवसांनंतर तरुणी आपल्या सासरी जात होती. यावेळी संजने तरुणीच्या स्काॅर्पियो गाडीचा पाठलाग केला. तसेच काही अंतरावर जाताच त्याने गाडी अडवली. यानंतर संजयने प्रेयसीवर गोळ्या झाडल्या. एवढंच नाही तर प्रेयसीवर गोळ्या झाडल्यानंतर संजयने स्वतः वर देखील गोळी झाडली.

दरम्यान, संजय आणि त्याच्या प्रेयसीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी तरुणी उपचार चालू असतानाच मृत झाली. तर संजय देखील गंभीर जखमी होता. तसेच त्याचा देखील काही वेळाने मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण; आरक्षणाबाबत भाजपचा दुतोंडी चेहरा”

धक्कादायक! मुलाचा बाप कोण हे शोधण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह काढला बाहेर

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

दिल तो बच्चा है जी! कॅरम खेळता-खेळता दोन म्हताऱ्यांमध्ये तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या तरूणाला नागपुरातून अटक!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More