नवी दिल्ली | देशभरातील टोलनाक्यासंदर्भातकेंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांन मोठी घोषणा केली आहे. दोन वर्षात देश होणार टोलमुक्त होणार असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.
टोलनाके नसले की वाहनांना कोणतेही व्यत्यय येता कुठेही प्रवास करणं शक्य होणार असल्याचं गडकरी म्हणाले. असोचॅमच्या कार्यक्रमात नितीन गडकरी सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते.
रशियन सरकारच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) ला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं असून, ही यंत्रणा लागू होताच भारत 2 वर्षांत टोलमुक्त होणार आहे, असंही गडकरींनी सांगितलं.
दरम्यान, जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर हे पैसे थेट बँक खात्यातून वजा केले जाणार आहेत. वाहनांच्या हालचालीच्या आधारे हे पैसे वसूल केले जाणार आहेत. सध्या सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमच्या अंतर्गत येत आहेत, तर सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत असल्याचं गडकरींनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
पहिल्या टप्यात राज्यातील ‘इतक्या’ जनतेला लस देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
केंद्र सरकारने कृषी कायद्यांना तूर्त स्थगिती द्यावी! समिती स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाची तयारी
…म्हणून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे
‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका