हैद्राबाद | आई-वडिलांनी पोटच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हैद्राबादमध्ये समोर आला आहे. आरोपी आई-वडिल उच्चशिक्षित असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.
अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी दोन तरुण मुलींचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हे हत्याकांड घडलंय.
27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साई दिव्या अशी मयत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं.
मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे.
थोडक्यात बातम्या-
न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर रितेश देशमुखची उघड उघड नाराजी; म्हणाला…
…अन् ‘आयर्नमॅन’ कृष्णप्रकाश यांनाही अश्रू आवरता आले नाहीत, पाहा व्हिडीओ-
6 महिन्यांपूर्वीच दिले होते संकेत; अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सिनेविश्वात खळबळ
मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्जी
“घरी बसून दुसऱ्याची मापं काढली तर लोक तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवतील”
Comments are closed.