नांदेड | नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमीयुगुलने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. मात्र या जोडप्यामधील तरुण हा अविवाहीत असून त्याची गर्लफ्रेंड विवाहीत होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाचं नाव रुद्र कांबळे (काल्पनिक नाव) असं असून त्याच्या विवाहीत प्रेयसीचं नाव भक्ती अलगुडे (काल्पनिक नाव) असं आहे.
रुद्र हा अवघ्या 24 वर्षांचा असून भक्ती ही 25 वर्षांची होती. भक्ती ही विवाहीत होती. मात्र पतीसोबत होणाऱ्या सतत भांडणांना कंटाळून ती नांदेडमध्ये आपल्या मामाच्या घरी गेल्या 4 वर्षांपासून राहत होती. यादरम्यान रुद्र आणि भक्ती यांचे काही दिवसांपुर्वी प्रेमसंबंध सुरु झाले. काही दिवसातच त्यांची प्रेमकहाणी घरच्यांसमोर आली. यावेळी घरच्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांच्या लग्नास नकार दिला.
रुद्रच्या घरातल्यांनी त्याचं लग्न लावून देण्याचा देखील निर्णय घेतला. मात्र त्याला भक्तीसोबतच लग्न करायचं असल्याने आणि घरातील वाढत्या विरोधाला पाहून रुद्रने अत्यंत धक्कादायक असं टोकाचं पाऊल उचललं आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी गावाजवळ असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलाॅनच्या दोरीने दोघांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. सकाळी ही बाब समोर येताच पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोचल्यानंतर मृतदेह खाली उतरुन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…
पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू
‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी
सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी
Comments are closed.