बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न; नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

जळगाव | राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच दरम्यान जळगावात एका कुटुंबाने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्हवर लग्न सोहळा साजरा केला. त्यासोबत 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली.

भीमराव जाधव यांचे चिरंजीव युवराज आणि औरंगाबाद येथील सुभाष सातदिवे यांची कन्या चैशाली यांचा विवाह आज 19 मार्च रोजी ठरला होता. अचानक कोरोना महामारी आली आणि सचारबंदी लागू झाली.

समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी मुला आणि मुलीकडील परिवाराला एक कल्पना सुचवली. केवळ 10 लोकांच्या उपस्थीतीत फेसबुक लाईव्हकरून लग्न उरकावे आणि लग्नात होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीत द्या.

25 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबरोबर कोरोना आजरावर नियंत्रण रहावं म्हणून काम करणाऱ्या पोलीस, पत्रकार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना सुरक्षा किट भेट देऊन साजरा केला.

ट्रेंडिंग बातम्या- 

आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

लातूर जिल्हा कोरोनामुक्त, आठही प्रवासी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

महत्वाच्या बातम्या-

सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल

गरजुसांठी पंचवीस गावांत पेटल्या चुली; बीडमध्ये रोज 5,000 भाकरींचा पुरवठा

मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More