बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पतीचा मृतदेह दिल्लीतील हाॅटेलमध्ये पडुन; पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी

नवी दिल्ली | मध्य दिल्लीच्या नबी करीम येथील एका हाॅटेलमध्ये अफगणिस्तान सेनेच्या निवृत्त मेजर जनरलचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथं जाऊन पोलिसांनी तपास केला. त्यादरम्यान संबंधित मृत व्यक्तीची माहिती समोर आली. संबंधित मृत झालेल्या मेजरचं नाव मोहम्मद रहीम वर्धक असं आहे. रहीम हे वयस्कर होते.

मोहम्मद रहीम आपल्या पत्नीसोबत 20 मार्चला भारतात आले होते. त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्यामुळे अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. यादरम्यान त्यांच्या पत्नी रुग्णालयात तर रहीम हाॅटेलमध्ये राहत होते. 24 एप्रिलला दोघेही आपल्या मायदेशी परतणार होते. मात्र 20 एप्रिलला पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र घरी जायचं असल्यामुळे त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. तसेच त्यांची चाचणी करणं देखील त्यांनी टाळलं.

आपल्या देशात परतण्याच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यामुळे त्या दुतावासाच्या मदतीने 24 एप्रिलला आपल्या मायदेशी परतल्या. यावेळी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दुतवासाच्या मदतीने रहीम यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला.

दरम्यान, कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर रहीम यांच्या मुलाने कोणालाच भारतात यायला जमणार नाही, असं सांगितलं. तसेच मृतदेह तिकडेच दफन करा असं देखील सांगितलं. यानंतर, दूतावास अधिकारी अतीक उर्र रहमान यांच्या उपस्थितीत पोलिसांनी 27 एप्रिल रोजी रहीम यांना भारतातचं दफन केलं. रहीम अफगाणिस्तान सैन्याचे मोठे अधिकारी राहिले होते. त्यांना अनेक मेडलही मिळाले होते.

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवणं ‘या’ पक्षाला पडलं महागात

मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे; भाजपला तर 50 जागाही मिळाल्या नसत्या, जर…

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More