‘सरकारच्या धोरणांशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही’; न्यायालयाचा दिशा रवीला जामीन
नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनविषयीच्या टूलकिटप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविला आज 23 फेब्रुवारीला जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेली दिशा रवीची मंगळवारी रात्री उशीरा जामिनावर तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. शेतकरी आंदोलनासंबंधित पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचं संपादन केल्याप्रकरणी दिशाला 13 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात सादर केलेले पुरावे अपुरे असल्यामुळे कोर्टानं दिशाचा जामीन मंजूर केलाय.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना आणि केंद्र सरकारला फटकारलं आहे. ‘दिशा रवीचा पार्श्वभूमि गुन्हेगारी स्वरुपाची नाही. कोणत्याही लोकशाही देशामध्ये नागरिक हे सरकारच्या अंतरात्माचे संरक्षक असतात. केवळ सरकारच्या धोरणांशी असहमती असल्याने एखाद्याला तुरुंगात टाकणं हे चुकीचं आहे, असं दिशा रवीला जामिनावर मुक्त करताना न्या. राणा यांनी सांगितलं. पोलिसांनी सादर केलेले अपुर्ण आणि अर्धवट पुरावे पाहता दिशाला जामीन नाकारण्याचं एकही कारण सापडत नाही, असं न्यायालयाने म्हटलं. एका 22 वर्षीय मुलीला कोठडीत ठेवण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाहीत असं सांगत पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने प्रश्न उपस्थीत केले. पोलिसांनी दिशाच्या आणखी 4 दिवसाच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे.
टसअॅप ग्रुप बनवणं, टूलकिट तयार करणं हा अपराध नाही. केवळ व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केल्यामुळे तिचा पोएटिक जस्टीस फाऊंडेशनशी संबंध जोडणं योग्य नाही. तिचा खलीस्तानी चळवळीशी संबंध असल्याचा एकही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. तसंच शेतकरी आंदोलनाला दिल्ली पोलिसांनीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे 26 जानेवारीला शांतनुने दिल्लीत येणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही.
टूलकिट आणि 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार याचा संबंध असणारा काही पुरावा आहे का?, अशी विचारणाही न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडे केली.
थोडक्यात बातम्या –
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर
…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा
प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं
संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे
Comments are closed.