पुणे महाराष्ट्र

तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला

अहमदनगर | तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला अहमदनगर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. चक्क त्याला न्यायालयातील खराब भिंती पुसण्याची शिक्षा ठोठावली आहे. बबन साळवे असं या पोलिसाचं नाव आहे.

बबन साळवे हे एका खटल्यासाठी आरोपींना न्यायालयात घेऊन आले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात तंबाखूचा तोबरा होता. त्यांना न्यायाधीशांना निट बोलताही येत नव्हतं. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांना ही शिक्षा सुनावली.

दरम्यान,न्यायालयातील तंबाखू, मावा खाऊन खराब झालेल्या भिंती त्यांना पुसायला लावल्या, तसंच न्यायाधीशांनी पोलिस अधिक्षकांना याविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!

-रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?

-नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!

-ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचं महत्व काय कळणार!

-भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या