Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कंगणाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले आहेत.

कंगणासह तिची बहीण रंगोली राणावतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कंगणाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगणा आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या