बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

अहमदनगर | अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरुन चार्टर्ड विमानाने तब्बल 10000 रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा अहमदनगरच्या नागरिकांसाठी आणला होता. परंतु आता सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप केला आहे.

सुजय विखे यांनी 10000 रेमडेसिविर इंजेक्शन विमानाने घेऊन येत गरजूंना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी करून माझ्या मैत्री संबंधाचा वापर करत मी इंजेक्शनचा साठा आणत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. त्यासाठी माझ्यावर कारवाई होईल की, नाही हे मला माहीत नाही. तसेच खाजगी विमानाने हे इंजेक्शन आणतो असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं होतं.

या सर्व प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांनी आणलेले सर्व रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सुजय विखे यांनी आणलेल्या दहा हजार इंजेक्शनचा साठा ताब्यात घ्यावा, असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने काढला आहे.

अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दिल्लीवरून चार्टर्ड प्लेनने इंजेक्शन आणणे महागात पडू शकतं. कारण आता न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत 10000 इंजेक्शन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ते गरजूंना लवकरात लवकर वाटप करावे असे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

मोफत लसीकरणाने महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More