मुंबई | कंगणा राणावतने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचं सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला.
न्यायालयाने कंगणाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकतं असा निकाल दिला होता. या निकालाला कंगणाने आव्हान देत पालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती.
कंगणा राणावतची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगणाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्यानंतर कंगणाने ज्या 8 नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असल्याचं व्यास यांनी म्हटलं. त्यांतनर मुंबई दिवाणी न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली.
थोडक्यात बातम्या-
“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”
भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत
अभिनेता सोनू सूदचा कंगणाला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाला…
हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा- मोहन भागवत
गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी