बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

अकोला | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या मागं सध्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यातील दिग्गज नेते बच्चू कडूंना अकोला जिल्हा न्यायालयानं अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.

कडू यांच्यावर सध्या सिटी कोतवाली पोलिसांत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणी न्यायालयानं कडू यांना 9 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या 1 कोटी 95 लाखांच्या कामात बच्चू कडूंनी परस्पर बदल करून निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीकडून करण्यात आला आहे. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवलं आहे.

दरम्यान, या अगोदरही बच्चू कडूंना निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं शिक्षा सुनावली होती.

थोडक्यात बातम्या – 

बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; दरमहा ‘इतके’ हजार मिळणार

“मी कधीच आई होऊ शकत नाही”, भर कार्यक्रमात अभिनेत्री ढसाढसा रडली

मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के; ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

हौसलों की दौड! दिव्यांग मुलीनं जिंकली सर्वांची मनं, प्रेक्षकही भावूक; पाहा व्हिडीओ

‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More