बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! ‘या’ प्रकरणात न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

जळगाव | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मागे मागील काही दिवसांपासून वादग्रस्त भूखंड जमीन खरेदी प्रकरणाचा ससेमिरा आहे. या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना अटकेपासून संरक्षण प्रदान करण्यात आलं होतं. यानंतर खडसेंनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली.

मुंबई सत्र न्यायालयाने एकनाथ खडसेंना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणात गिरीश चौधरी हे 5 जुलैपासून अटकेत आहेत.

या प्रकरणामध्ये मंदाकिनी खडसेंना जामीन मिळालेला आहे. आता मुंबई सत्र न्यायालयाने एकनाथ खडसेंना अंतरिम जामीन मंजूर केल्याने आता एकनाथ खडसेंना दिलासा मिळाल्याचं आहे. त्यामुळे आता नाथाभाऊंचे समर्थक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी भागात भूखंड विकत घेण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळं त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

थोडक्यात बातम्या –

‘शमी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो’; शमीवर टीका करणाऱ्यांना दिग्गजांनी झापलं

तुमचंही कमी वयात टक्कल पडतंय का? जाणून घ्या कारण

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More