Top News मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई । ॲमेझाॅनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याबाबत मनसेने मागणी केली होती. दरम्यान मनसेने यासंदर्भात मोहीम देखील सुरु केली होती. तर आता या मोहिमेने आक्रमक स्वरूप धारण केलंय.

या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेतल्याने अ‍ॅमेझॉन कोर्टात गेलंय. यासंबंधी दिंडोशी न्यायालयाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलीये.

या नोटीसीनुसार, राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे हा वाद अजून चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

इतर राज्यांमध्ये अ‍ॅमेझॉन त्या राज्याच्या संबंधित भाषेचा वापर करतं. मात्र मराठी भाषेचा वापर ॲपवर केला जात नसल्याने मराठी भाषेचा समावेश ॲपमध्ये करावा अशी मागणी मनसेने केली होती. यासंदर्भात अ‍ॅमेझॉन विरुद्ध ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ या मोहीम छेडण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन यांना खुलं निमंत्रण

…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती

कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात!

…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी

औरंगाबादमधील विचित्र घटना! कोरोना होऊन गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या