बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुलीवरून न्यायालयाचा ‘एमएसआरडीसी’ ला दणका; कॅगला दिले ‘हे’ आदेश

मुंबई | यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर सुरु असलेल्या टोलवसुलीबाबत उच्च न्यायालयाने केंद्रीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील टोलवसुली पूर्ण झालेली नसल्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केलं आहे.

यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाला बांधण्यासाठी आलेला खर्च पूर्णतः वसूल झालेला असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणखी किती वर्ष ही वसुली सुरू ठेवणार? असा प्रश्न विचारला होता. न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना महामार्ग बांधण्यासाठी आलेला खर्च 30 वर्षांपर्यंत वसूल करण्याचा अधिकार एमएसआरडीसीला देण्यात आला असून टोलच्या माध्यमातून 22 हजार 370 कोटी 22 लाख रुपये अजून वसूल करण्याचे बाकी आहेत असं  एका प्रतिज्ञापत्राद्वारे एमएसआरडीसीने न्यायालयाला सांगितलं.

बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र राज्य विकास महामंडळावर टोलवसुलीबाबत होत असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची आणि जनहित याचिकांमधील मुद्दे तसेच एमएसआरडीसीच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे लक्षात घेऊन सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश कॅगला दिले आहेत.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग बांधकामाचा खर्च किती होता आणि आतापर्यंत टोलच्या स्वरूपात किती रक्कम वसूल झाली आहे? याबाबत न्यायालयाने विचारणा केली असता महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे वकील मिलिंद साठे यांनी 2004 ला 3 हजार 632 कोटी वसूल व्हायचे होते असं न्यायालयाला सांगितलं. या असमाधानकारक उत्तरावर न्यायालयानं एमएसआरडीसीवर नाराजीही व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या

जळगावात भाजपला मोठा धक्का; महापालिकेवर शिवसेनेनं फडकवला भगवा

राज्यातील भाजपच्या या बड्या नेत्याला झाली कोरोनाची लागण

सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर

न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More