Covaxin l कोव्हीशील्डच्या दुष्परिणामांमुळे संपूर्ण देशात आणि जगामध्ये गदारोळ माजला होता. आता दरम्यान, Covaxin बाबतही एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ज्या नागरिकांनी Covaxin घेतले आहे त्यांच्यामध्येही दुष्परिणाम दिसून आले असल्यामूळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Covishield नंतर Covaxin लसीचा देखील दुष्परिणाम :
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात नागरिकांना कोविडची लस देण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात काही नागरिकांनी कोविशील्ड लस घेतली तर काही नागरिकांनी Covaxin लस घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच कोविशील्डच्या दुष्परिणामांच्या बातम्यांनी लोक घाबरले होते. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन कंपनीबाबतही धक्कादायक अहवाल समोर आला आहे. हा संपूर्ण संशोधन अहवाल बीएचयूच्या संशोधकांनी तयार केला आहे.
या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोवॅक्सिन घेतलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हा अहवाल समोर येताच कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Covaxin वर आधीच अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहे ज्याने हे सिद्ध केले आहे की ते पूर्णपणे सुरक्षित आहे. Covaxin चा सुरक्षितता ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट असल्याचे कंपनीकडून म्हणण्यात आले आहे.
Covaxin l रिसर्चमध्ये काय आढळले :
कोवॅक्सिनवर केलेल्या संशोधनात 1 हजार 24 जणांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये 636 लोक 25 वर्षांचे आणि 291 तरुण होते. हे सर्व लोक लस दिल्यानंतर एक वर्ष पाठपुरावा करत होते. त्यापैकी ४८ टक्के तरुणांचा दावा आहे की, त्यांना श्वसनमार्गाच्या संसर्गासारख्या आजारांनी ग्रासले होते. तर 42.6 टक्के म्हणजे,124 तरुणांना मज्जातंतूंचा त्रास होऊ लागला, तर 5.8 टक्के तरुणांना लस घेतल्यानंतर नसा, सांधे आणि हाडांमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत.
अहवालानुसार, Covaxin चे महिलांवर गंभीर दुष्परिणाम आढळून आले आहेत. लस घेतल्यानंतर सुमारे 4.6 टक्के महिलांना मासिक पाळी संबंधित समस्या येतात. तर 2.7 टक्के महिला डोळ्यांशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. एवढेच नाही तर काही महिलांना थायरॉईडसारखे गंभीर आजार असल्याचेही आढळून आले आहे.
News Title – Covaxin Corona Vaccine Side Effect
महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा, थेट म्हणाले..
दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे, ‘या’ उमेदवाराने शिंदे गटावर केला आरोप
ग्राहकांनो सराफ दुकानात जाण्याआधी ही बातमी वाचा! जाणून घ्या सोने, चांदीचे आजचे दर
एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्यानी दिला तडकाफडकी राजीनामा