देश

“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

नवी दिल्ली | भारत सुदैवी आहे, कोरोनाच्या संकटावर मात करु शकणारा नेता आज आपल्याजवळ आहे. पंतप्रधान मोदींचा योग्य विचार आणि वेळीच निर्णय घेतला नसता, तर परिस्थिती खूप वाईट असती, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस हे मागच्या सहा वर्षातील मोदी सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे काय स्थिती आहे ते आपण पाहू शकतो. लॉकडाउनचा निर्णय धाडसी होता आणि तो योग्य वेळी घेण्यात आला, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी सरकारने विचार न करता लॉकडाउनचा निर्णय घेतला हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयाने वर्षभरात काय-काय साध्य केलं? त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाचं उदहारण दिलं. सीडीएस या पदाची निर्मिती ही महत्वपूर्ण कामगिरी असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

“मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत”

पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या