महाराष्ट्र मुंबई

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोविडबाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर कोर्टाने मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला तर व्यक्तीचा मृत्यूदेह दफन करू नये याबाबत मुंबई हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत. यावर निकाल देताना कोर्टाने कोविड 19 बाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे.

एवढंच नव्हे तर याबाबत मुंबई महानगरपालिकेने नव्याने आदेश काढावेत. तसेच मृतदेह दफन करताना नातेवाईकांची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे ही हायकोर्टाने या आदेशात म्हटलं आहे. पण त्यानंतर त्याच दिवशी ज्या दफनभूमीत मोठी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेह दफन करु शकता, अशा आशयाचा दुसरा सुधारित आदेश पालिकेने काढला. या दोन्ही आदेशाविरोधात कोर्टात याचिका करण्यात आली होती.

दरम्यान, यात दुसऱ्या सुधारित आदेशाविरोधात वांद्रे परिसरातील राहणारे प्रदीप गांधी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वांद्रे येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये दफन विधी करू नये अशी मागणी केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

‘या’ नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई ते वर्धा पायपीट करत गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या