महाराष्ट्र मुंबई

मुंबईत आणखी एका महिलेचा मृत्यू; कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

Loading...

मुंबई | मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर कस्तुरबा रुग्णलयात उपचार सुरु होते.

नवी मुंबईतही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आज सकाळीच समोर आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर पोहोचली.

Loading...

मुंबईतील पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसामठी पाठवण्यात आले. या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट 24 मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या