Top News नाशिक

नाशिकमध्ये कडक लॉकडाउन, पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय

नाशिक | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. राज्यात अनेक भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येतायत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजाणी केली जाणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

कोरोनाच्या संकटावर भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी भुजबळ म्हणाले, “नाशिकमध्ये लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या वेळेत जिल्ह्यात कर्फ्यूसदृश्य परिस्थिती असेल”.

भुजबळ पुढे म्हणाले, “व्यापारी संघटनांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपली दुकानं उघडी ठेवावीत. 5 वाजल्यानंतर आपोआप गर्दी कमी होईल याचा विचार करत संध्याकाळी 7 ते सकाळी 5 जनता कर्फ्यू जास्त कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.”

दुसरीकडे राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केलीये. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सरकारने अनेक निर्बंध शिथील केलेत आणि अनेक गोष्टींना परवानगी दिलीये. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

तब्बल 1 कोटी लोकांची शिवभोजन थाळीने भागवली भूक, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही मागणी पंतप्रधान मोदींनी केली मान्य

सुशांतसाठी मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकरने घेतला मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या