देश

ब्रिटनहून परतलेली बेपत्ता कोरोनाबाधित महिला आंध्रात सापडली!

नवी दिल्ली | ब्रिटनवरून परतलेली आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेली महिला दिल्ली विमानतळावरून अचानक गायब झाली होती. संबंधित महिला आंध्र प्रदेशमधील राजमुंदी येथे सापडली आहे.

संबंधित महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. तिचा मुलगा दिल्लीपासून राजमुंद्रीपर्यंत तिच्यासोबत होता. त्याचीही कोरोनाचाचणी केली जाणार आहे. त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयाच्या विशेष विभागात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पूर्वा गोदावरी जिल्हा आरोग्यसेवा समन्वयक डॉ. टी. रमेश किशोर यांनी दिली आहे.

महिलेला आणि तिच्या मुलाला आरोग्य अधिकाऱ्यांनी राजमुंद्री रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे.

दरम्यान, महिलेला लागण झालेला विषाणू नवीन आहे का, याबाबत तपासणी केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?”

राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ

शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत- राहुल गांधी

“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या