पुणे महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटात पुण्यातील गणेशोत्सव मंडळाकडून समाजापुढे नवा आदर्श, घेतला महत्त्वाचा निर्णय!

पुणे | शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सदैव सामाजिक भावना आणि भान ठेवून सामाजिक योगदानात सहभागी होतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळानी आपल्या परीने सर्वतोपरी मदत केली आहे. आज गणेश मंडळाच्या वतीनं कोविड केअर सेंटर उभारून समाजापुढे नवा आदर्शच घालून दिला आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुण्यनगरीचे अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळांनी पालिकेला मदतीचा हात पुढे कर महापालिकेसमवेत संयुक्तरित्या फर्ग्युसन महाविद्यालय येथील वसतिगृहात ३०० रुग्णांकरीता ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू केले आहे. यात ग्रामदैवत श्री. कसबा गणपती, ग्रामदेवता श्री. तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री. गुरुजी तालीम गणपती, श्री. तुळशीबाग गणपती, केसरी गणपती, श्री. भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री. अखिल मंडई गणपती आणि श्री. दगडूशेठ हलवाई गणपती या गणेशोत्सव मंडळांचा यात सहभाग आहे. समस्त पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व मंडळांचे मनापासून आभार मानले आहेत.

महापालिकेसमवेत समन्वय साधण्यासाठी एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले असून गणपती मंडळे महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटरच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये सहकार्य करणे, कोव्हीड केअर सेंटरमधील सर्व व्यक्तींसाठी दैनंदिन भोजन, न्याहारी, चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी याची सुविधा  मंडळांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे आयुष-मंत्रालयांनी व ICMR ने प्रमाणित केलेले आयुर्वेदिक औषधे, काढे आणि रूग्णांसाठी गरम पाणी यांची सुविधा, कोव्हीड केअर सेंटरसाठी PPE kit, अश्या प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ही अष्टविनायक मंडळे पार पाडणार आहे.

मंडळांनी सेंटरसाठी १ MBBS व ३ बी.ए.एम.एस. डॉक्टर्स यांचे पॅनेल नियुक्त करावे व त्यांचेमार्फत केंद्रात दाखल रूग्णांना आयुर्वेदिक काढे व औषधे आपल्या जबाबदारीवर देण्यात यावे. मंडळांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड पुरविण्यात यावे. सेंटरमध्ये २४ तास सुरक्षारक्षक व्यवस्था पुरविण्यात यावी. सेंटरमधील रूग्ण क्षमता वाढीसाठी आवश्यक ते अतिरिक्त १०० बेडस पुरविण्यात यावे. केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नेमण्याची जबाबदारी मंडळांची राहील. सेंटरसाठी एक रूग्णवाहीका पुरविण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंचं भावनिक ट्विट

बारामतीत कोरोनाने हातपाय पसरले, अजित पवार ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये!

आरोग्यमंत्र्यांचा ‘उर्जास्त्रोत’ काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्र्यांना तीव्र दु:ख

राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, सुप्रिया सुळे हळहळल्या

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या