बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

मुंबई। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,249 कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. एकूण कोरोना रूग्णांपैकी 978 रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ बघता सर्वांचच टेंशन वाढलं आहे.

राज्यात 3,249 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 1 जुलैपर्यंत 23,996 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पावसाळ्यामुळे वेगवेगळ्या आजरांचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात 29 रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दुसरूकडे 14,684 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

थोडक्यात बातम्यात-

‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका

“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर

“चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचा गाल लाल करणार होतात, आता वचन नक्की पाळा”

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More