बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं थैमान! 24 तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

नवी दिल्ली | कोरोनाचा धोका कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही कोरोना वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आज देशात 13 हजार 216 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीत 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

देशात कोरोनाची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 8 हजर 148 रुग्णांनी कोरोना वर मात केली. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात शुक्रवारी नव्याने 4265 कोरोना रुग्णांची नोंद झाली आले. त्यातील 2255 रुग्ण हे मुंबईत आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, दिल्लीत 24 तासात 1795 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी बघता प्रशासनही सतर्क झालं आहे. कोरोनाचा वाढता धोका बघता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक खुलासा

अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार, म्हणाले…

अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘हा तर अपमान आहे’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“मित्रांपासून दूर राहा, आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More