ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप
पुणे | बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोव्हिड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, सरकारने ही सेंटर्स बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना चालवायला दिली आहेत, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
आज पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील ‘ड्रीम्स मॉल’ला लागलेल्या आगीवरूनही सरकारला लक्ष्य केले. राज्यात इमारती, रुग्णालय आणि मॉल्समध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. इमारतींमध्ये अग्निरोधक सुविधा उपलब्ध नसल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अपयश येत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटची घोषणा केली होती, असंही निलेश राणे म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या ‘अॅंटिलिया’ बंगल्याबाहेरील स्फोटक प्रकरणावरून देखील आता भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का उभी केली? ते एनआयच्या तपासात पुढे येईल, हे प्रकरण शिजवत कोण होतं, याचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यत जातील, असं सांगत निलेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
थोडक्यात बातम्या –
दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!
शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण
‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग!
‘ज्या अभिनेत्रीच्या हातावर मी थुंकतो ती…’ ; अमिर खानचा व्हिडीओ व्हायरल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.